तंत्रज्ञान

From translatewiki.net
Revision as of 05:38, 4 November 2015 by V.narsikar (talk | contribs) (typos)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to navigation Jump to search


ट्रांसलेटविकि.नेट हे, भाषांतराचे काम अधिक गतीने होण्यास व चांगले निकाल मिळण्यासाठी बहुविध अश्या मदतगार तंत्रज्ञानांचा वापर करीत आहे. कृपया भाषांतर शिकवणीसामान्य दस्ताऐवजीकरण हे या विकिवर विशेषत्वाने नसलेले 'भाषांतर अभियंत्र' (ट्रांसलेशन इंजिन) ही बघा.

भाषांतर साधने

सोपी भाषांतर साधने ही उच्चरित्या उपयुक्त माहितीचे संकलन आहे.

ईतर भाषांमध्ये भाषांतर
भाषांतर करतांना, आपण दिसण्यासाठी कोणतीही भाषा निवडू शकता.निवडलेल्या भाषेत भाषांतर,(ती भाषा उपलब्ध असल्यास), दाखविल्या जाते.संबंधित भाषेतील भाषांतर,हे आपणास शब्दांबद्दल व व्याकरणाबद्दल कल्पना देते, किंवा, ते आपण ईतर भाषा शिकण्यास वापरू शकता!
संदेशांचे दस्तऐवजीकरण
सर्व सॉफ्टवेअरमध्ये ते सर्व चलाखीचे संदेश असतात जे, संदर्भ देउनही, समजण्यास कठिण असतात.ट्रांसलेटविकि.नेटवर त्या संदेशांना पूर्वीच मदतपूर्ण दस्ताऐवजीकृत केलेले असण्याची शक्यता जास्त आहे.तसे नसल्यास,आम्ही तुम्हास ते मिळवून देण्यास मदत करू.फक्त आपली विनंती आमच्या साहाय्य पानावर नोंदवा. दस्ताऐवजीकरण आपणास संदर्भ सांगते,(जसे-कळ,शीर्षक), चल (व्हेरिएबल) कोणते आहेत व ते सर्व सांगते, ज्याची आपणास भाषांतर करतांना गरज असते.
वाक्यान्वयीन तपास
आम्ही सामान्य तपास अमलात आणले आहेत जे आपणास साधारण चुकांसाठी,जसे न वापरलेली व अनोळखी चले (व्हेरिएबल्स),खराब एचटीएमएल मार्क अप व असंतुलित ब्रेसेससाठी सजग करतात. या साधारण चुकांमुळे बिघडलेला किंवा खराब डिस्प्ले मिळू शकतो, म्हणून त्या लवकर शोधणे महत्वाचे आहे.

भाषांतर तंत्रज्ञान

हे अत्यंत प्रगत असे तंत्रज्ञान आहे जे संगणक विज्ञान व भाषेचे तंत्रज्ञान यातील उन्नत टप्प्यांचा वापर करते.

भाषांतर स्मृती
आम्ही भाषांतर साधन-संचहे भाषांतर स्मृती सॉफ्टवेअर वापरतो.भाषांतर स्मृती आपणास जास्त सुसंगत भाषांतरे करण्यास मदत करते व त्यासारख्या आणि पुन्हा पुन्हा येणाऱ्या संदेशांच्या भाषांतराची गती वाढविते.
यांडेक्स आणि माइक्रोसॉफ्ट भाषांतर
तुम्ही यांडेक्स ट्रांसलेट किंवा मायक्रोसॉफ्ट ट्रांसलेटर द्वारा दिल्या जाणाऱ्या भाषांतर पर्यायांचा लाभ घेउ शकता; जर तुमची भाषा तेथे समाविष्ट असेल तर.मानवीकृत नकला‌-डकवा नकोच,भाषांतर सुरू करतांना तेथे सूचवण्या असतातच.