MediaWiki:Prefswitch-main/mr

From translatewiki.net
विकिपीडियाच्या नविन चेहरामोहर्‍याचे पटलदृष्य (विस्तृत)
पायाभूत पान संपादण्याचे पटलदृष्य (विस्तृत)
दुवे टाकण्यासाठी असलेल्या नविन संवाद पेटीचे पटलदृष्य

विकिमिडिया फाउंडेशनची ’सदस्य अनुभव चमू (User Experience Team)’ ही आपणास काम करणे सोपे व्हावे म्हणुन विकिसमाजातील स्वयंसेवकासमवेत काम करीत आहे. आपल्यासमवेत, नविन चेहरामोहर्‍यासह व सोप्या संपादन तोंडवळ्यासह काही सुधारणा आदानप्रदान करण्यास आम्ही आतूर आहोत.नविन सदस्यास सुरुवात करण्यास अभिप्रेत हे बदल त्यांना सोपे पडतील व ते usability testing conducted over the last year यावर आधारीत आहेत. आमच्या प्रकल्पांचा वापर (कोणासही) सोप्या पद्धतीने करता यावा ही विकिमिडिया फाउंडेशनची प्राथमिकता आहे आणि भविष्यात आम्ही यात आणखी अद्ययावतता आणुन ती आपल्यासह आदानप्रदान करु.अधिक विस्तृत माहितीसाठी विकिमिडियासंबंधित blog post या संकेतस्थळास भेट द्या.


आम्ही काय बदलले आहे ते येथे बघा

  • सुचालन: पाने वाचण्यास व संपादण्यास सोपे जावे म्हणुन आम्ही सुधारणा केल्या आहेत.सध्या, प्रत्येक पानाच्या वरील बाजूस असलेली ’टॅब’ ही जास्त स्पष्टपणे हे दर्शविते कि, आपण तेच पान पहात आहात की, त्याचे चर्चापान आणि आपण ते पान वाचत आहात की संपादन करीत आहात.
  • संपादन साधनपट्टीतील सुधारणा: आम्ही, वापरात अधीक सुलभता मिळावी म्हणून, संपादन साधनपट्टी ची पुर्नरचना केली आहे . पानांची रचना करणे अधीक सुगम आणि सोपे झाले आहे.
  • दुवे सहाय्यक: इतर विकिपानांना आणि बाह्य दुवे देण्याकरिता, वापरास सोपे असे साधन, तुम्हाला अधीक सुलभता उपलब्ध व्हावी म्हणून उपलब्ध केले आहे.
  • शोध सुधारणा: तुम्ही शोधत असलेले लेख/पान लवकर मिळण्याकरिता आम्ही शोध सुचवणीत सुधारणा केल्या आहेत.
  • इतर नवीन वैशिष्ट्ये: सारणी (टेबल) सोपी करण्यासाठी आम्ही आता एक 'नवीन सारणी (टेबल) सहाय्यक' उपलब्ध केला आहे आणि संपादनांमध्ये सुलभता आणण्याकरिता शोधा आणि बदला (find and replace) वैशिष्ट्य सुद्धा उपलब्ध केले आहे.
  • विकिपीडिया लोगो: आम्ही आमचा लोगो अद्ययावत केला आहे. Wikimedia blog येथे अधीक वाचा.