Project:गुप्तता नीती

From translatewiki.net
Jump to: navigation, search
This page is a translated version of the page Project:Privacy policy and the translation is 100% complete.

Other languages:
Аҧсшәа • ‎Afrikaans • ‎Ænglisc • ‎العربية • ‎asturianu • ‎авар • ‎azərbaycanca • ‎تۆرکجه • ‎Bikol Central • ‎беларуская • ‎български • ‎روچ کپتین بلوچی • ‎বাংলা • ‎བོད་ཡིག • ‎بختیاری • ‎brezhoneg • ‎bosanski • ‎català • ‎нохчийн • ‎کوردی • ‎čeština • ‎словѣньскъ / ⰔⰎⰑⰂⰡⰐⰠⰔⰍⰟ • ‎dansk • ‎Deutsch • ‎Zazaki • ‎dolnoserbski • ‎डोटेली • ‎Ελληνικά • ‎emiliàn e rumagnòl • ‎English • ‎British English • ‎Esperanto • ‎español • ‎español (formal) • ‎eesti • ‎euskara • ‎فارسی • ‎suomi • ‎føroyskt • ‎français • ‎Frysk • ‎galego • ‎Avañe'ẽ • ‎ગુજરાતી • ‎客家語/Hak-kâ-ngî • ‎Hawaiʻi • ‎עברית • ‎हिन्दी • ‎hrvatski • ‎hornjoserbsce • ‎magyar • ‎interlingua • ‎Bahasa Indonesia • ‎ГӀалгӀай • ‎íslenska • ‎italiano • ‎日本語 • ‎ქართული • ‎Taqbaylit • ‎қазақша (кирил)‎ • ‎ភាសាខ្មែរ • ‎ಕನ್ನಡ • ‎한국어 • ‎한국어 (조선) • ‎Karjala • ‎Ripoarisch • ‎Kurdî (latînî)‎ • ‎Кыргызча • ‎Kilaangi • ‎Lëtzebuergesch • ‎لەکی‎ • ‎لۊری شومالی • ‎lietuvių • ‎Mizo ţawng • ‎latviešu • ‎македонски • ‎मराठी • ‎Bahasa Melayu • ‎эрзянь • ‎Nāhuatl • ‎Bân-lâm-gú • ‎Napulitano • ‎Nederlands • ‎occitan • ‎Livvinkarjala • ‎Oromoo • ‎ਪੰਜਾਬੀ • ‎Kapampangan • ‎Deitsch • ‎polski • ‎Piemontèis • ‎پښتو • ‎português • ‎português do Brasil • ‎română • ‎tarandíne • ‎русский • ‎саха тыла • ‎Santali • ‎Scots • ‎سنڌي • ‎Sängö • ‎srpskohrvatski / српскохрватски • ‎Tašlḥiyt/ⵜⴰⵛⵍⵃⵉⵜ • ‎සිංහල • ‎slovenčina • ‎سرائیکی • ‎slovenščina • ‎shqip • ‎српски (ћирилица)‎ • ‎Basa Sunda • ‎svenska • ‎தமிழ் • ‎ತುಳು • ‎తెలుగు • ‎ไทย • ‎Tagalog • ‎толышә зывон • ‎Türkçe • ‎татарча • ‎ⵜⴰⵎⴰⵣⵉⵖⵜ • ‎удмурт • ‎ئۇيغۇرچە • ‎українська • ‎اردو • ‎vepsän kel’ • ‎Tiếng Việt • ‎მარგალური • ‎ייִדיש • ‎中文(简体)‎ • ‎中文(繁體)‎ • ‎中文(香港)‎

सामान्य आवाका

या नीतीत,ट्रांसलेटविकि.नेट वर त्याच्या सर्व्हरवर,प्रकल्प व त्याच्या समाजाशी संबंधित वैयक्तिक ओळख देणारी माहिती, जमविलेली किंवा साठविलेली याचा अंतर्भाव आहे. ट्रांसलेटविकि.नेट त्याच्या प्रकल्पाच्या कार्यरत राहण्याच्या गरजेइतकीच किमान वैयक्तिक ओळख देणारी माहिती जमविते व धारण करून ठेवते.

सार्वजनिक व सहयोगी स्वभावाचे प्रकल्प

ट्रांसलेटविकि.नेटला, त्यातील सदस्यांनी, मिडियाविकि सॉफ्टवेअर वापरून एकत्रित सहभागातून विकसीत केले आहे. ज्याकोणास संपादनाची परवानगी मिळाली ते पंजीकृत सदस्य, सनोंदप्रवेशित होउन या संकेतस्थळावरील संपादनायोग्य पाने संपादीत करु शकतात.असे करण्याने संपादक हे अश्या दस्ताएवजास सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करतात व त्या ,काढलेल्या व बदलविलेल्या प्रत्येक शब्दाचा सर्वसामांन्यास खुला असा दस्ताएवज तयार करतात. ही सार्वजनिक क्रिया आहे व त्याचे संपादक हे सार्वजनिकरित्या त्या बदलांचा लेखक म्हणून ओळखल्या जातात.या प्रकल्पावर केलेले सर्व योगदान व सार्वजनिकरित्या उपलब्ध त्या योगदानांची माहिती ही, न परतवण्याजोगा परवाना मिळालेली व त्याची नक्कल करण्याजोगी,ती उद्धृत करु शकण्याजोगी,पुनर्वापर करण्याजोगी व त्यास तिसऱ्या पक्षाद्वारे, काही निर्बंधांसह,अनुकुलन करण्यास योग्य अशी असते.

ट्रान्सलेटविकी.नेट वरचे उपक्रम.

सामान्यरित्या, हे धोरण/नीती translatewiki.net (ट्रांसलेटविकि.नेट)ने जमा केलेल्या किंवा धारण केलेल्या वैयक्तिक माहितीसाठी लागु असुन ते सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही.

translatewiki.net (ट्रांसलेटविकि.नेट)ची आंतरक्रिया, या नीतीत समाविष्ट न केलेली परंतु, ती त्याच्या मर्यादेत नसून,पाने बघणे किंवा न्याहाळणे, विकिची 'ई-मेल यूजर' क्रिया वापरणे, ही आहे.ह्या आंतरक्रिया, एखाद्या योगदानकर्त्याचा अंकपत्ता,व ईतर वैयक्तिक माहिती भेदभाव न करता, translatewiki.net (ट्रांसलेटविकि.नेट)वर वैयक्तिकरित्या कार्य करणाऱ्या सामान्य लोकांना, किंवा स्वतंत्ररित्या कार्य करणाऱ्या विशिष्ट नमूद गटांना उघड होउ शकते.

सदस्य ट्रांसलेटविकि.नेट बाहेर विपत्राद्वारे,आयआरसी किंवा ईतर चॅटद्वारे किंवा स्वतंत्र संकेतस्थळांद्वारे एकमेकाशी परस्पर संपर्क साधू शकतात व त्यापूर्वी त्यांनी, यात अंतर्भूत असलेली जोखीम ,तसेच,वैयक्तिक गुप्ततेची गरज, संपर्काच्या या पद्धती वापरण्याआधी, पडताळून पहावी.

सदस्यांचे खाते व जनकत्व:

Translatewiki.netला त्यांच्या संकेतस्थळासाठी संपादक हवेत जरी काही पाने सदस्यनावासह सनोंद प्रवेशित न होताही संपादल्या जाउ शकतात, या बाबतीत,अंकपत्त्याद्वारे ओळख नोंदविल्या जाईल.जे सदस्य आपल्या सदस्यनावाद्वारे सनोंद प्रवेश घेतात त्यांना, त्यांनी निवडलेल्या सदस्यनावाद्वारे ओळखल्या जाते.सदस्य एक परवलीचा शब्द निवडतात, जो गोपनिय असतो ज्याद्वारे त्यांच्या खात्याच्या सचोटी खातरजमा केल्या जाते.जोवर कायद्याद्वारेच आवश्यक असल्याशिवाय,कोणाही व्यक्तिने एकतर सदस्य-परवलीचा शब्द व/किंवा तयार झालेल्या कुकीज उघड करु नये.एकदा तयार झाल्यावर,जोवर नि:सदिग्ध धूर्त ईरादा असल्याशिवाय,जो translatewiki.net च्या कर्मचारीवर्गाद्वारे तपासल्या जातो, ते सदस्यखाते हटविल्या जात नाही.सदस्यनाव बदलणे एखादवेळी शक्य आहे.सदस्यनाव विनंतीवरुन बदलण्याची Translatewiki.net खात्री देत नाही.

खाजगी माहितीच्या संकलनाचे प्रयोजन

Translatewiki.netला वैयक्तिक सदस्य माहिती गोळा करण्याबाबत,त्याच्या प्रकल्पांच्या भल्यासाठी आपल्या मर्यादा पाळते, यासह पण खालील मर्यादा नसलेले:

  • प्रकल्पाची सार्वजनिक जबाबदारी वाढविण्यास Translatewiki.net हे जाणते कि कोणतीही प्रणाली, जी शक्य तितक्या जास्तीत जास्त सामान्य लोकांच्या सहभागास परवानगी देते,ती, गैरवापरास व गैर-उत्पादक वागणुकीस खुली असेल.उदाहरणार्थ, प्रकल्पावर जेंव्हा तपासणी केल्या गेली,तेंव्हा सॉकपपेटचा(नकली खाते)संशयित वापर, उत्पात,दुसऱ्या सदस्यांना त्रास देणे किंवा तोडफोडीची वागणुक, अश्या प्रकरणात,सदस्याच्या अंकपत्त्याचा(त्या त्या लॉग्जवरुन किंवा डाटाबेसमध्ये असलेल्या अभिलेखामधून)वापर, गैरवर्तणुकीचा स्रोत शोधण्यास केल्या जाउ शकतो.ही माहिती सदस्य व्यवस्थापन अधिकाऱ्याशी सहभागी करु शकतो ज्याचेकडे प्रकल्प सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे.
  • संकेतस्थळाची सांख्यिकी देण्यास, Translatewiki.net सदस्याच्या भेटीचा कच्च्या डाटाचा सांख्यिकिय नमूना घेते. या नोंदी संकेतस्थळाचे सांख्यिकी पान तयार करण्यास वापरल्या जातात;हा कच्चा लॉग डाटा सार्वजनिक केल्या जात नाही.
  • काही तांतिक अडचणी सोडविण्यासाठी.विकसकांद्वारे, तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी व गैरवर्तणुक करणारे जाल स्पायडर्स,जे संकेतस्थळास उद्युक्त करतात, लॉग-डाटाचे परिक्षण केल्या जाउ शकते.

Translatewiki.net बाह्य विदागारामार्फत जावास्क्रिप्ट सारखी संसाधने भारण करु शकते ज्याद्वारे,आपल्या गुप्ततेवर परिणाम होऊ शकतो(जसे गूगलअॅडवर्डस् किंवा भाषांतर सल्ला).अनावश्यक माहिती उघड करण्याच्या क्रियेस सौम्य करणे हे सदस्यांवर अवलंबुन आहे कारण संसाधन हे बाह्य विदागारामार्फत भारण करण्यात येते.

मजकूर प्रतीधारणेचा तपशील

सामान्य अपेक्षा

अंकपत्ता व ईतर तांत्रीक माहिती

जेंव्हा एखादा अभ्यागत विनंती करतो किंवा पान वाचतो तेंव्हा,कोणतीही संकेतस्थळे, सामान्यतः जी माहिती संकलित करतात, त्याव्यतिरिक्त कुठीलीही वेगळी माहिती संकलीत होत नाही.

कदाचित, ट्रान्सलेटविकी.नेट अश्या देवघेवीबाबतच्या कच्च्या नोंदी ठेवेल,पण त्यांचे कधीही प्रकाशन करणार नाही.

जेव्हा एखादे पान सनोंद-प्रवेशिलेल्या संपादकाद्वारे संपादित केल्या जाते, तेव्हा, सर्व्हर गुप्तपणे अंकपत्त्याबद्दलची गोपनिय माहिती अल्पकाळासाठी साठवतो. ती साठवलेली माहिती पूर्वनिर्धारीत वेळेनंतर आपोआप काढून टाकली जाते. जे संपादक सनोंद-प्रवेश करत नाहीत त्यांच्या अंकपत्त्यास,सार्वजनिकरित्या व स्थायीरुपी, त्या संपादनांचा संपादक असे श्रेय दिल्या जाते. ऊपलब्ध असलेल्या माहितीतून व अंकपत्त्याच्या संयोजनातून त्रयस्थ पक्षाला लेखकाची ओळख सिद्ध करणे शक्य आहे.पंजीकृत सदस्यनावाने सनोंद-प्रवेशणे, हे, आपल्या खाजगी माहितीचे अधिक चांगल्या रितीने संरक्षण करते.(आपला अंकपत्ता त्याने जाहिर होत नाही.)

कुकीज

हे संकेतस्थळभेट देणाऱ्याच्या संगणकावर तात्पुरत्या सत्र कुकीज् स्थापित करते जेंव्हा एखाद्या पानास भेट दिल्या जाते. ज्या वाचकांना सनोंद प्रवेश घ्यायचा नाही किंवा संपादनासाठी ते अश्या कुकीज् नाकारु शकतात; न्याहाळकाच्या सत्रांततेवेळी त्या वगळल्या जातील.सनोंद प्रवेश स्थिती राखण्यासाठी,सनोंद प्रवेशिताच्या अधिक कुकिज् स्थापित केल्या जाउ शकतात.जर एखाद्याने आपले सदस्यनाव व परवलीचा शब्द आपल्या संगणकावर जतन केले तर,ती माहिती ३० दिवसांसाठी जतन केल्या जाईल,व या माहितीचे, प्रत्येक वेळेस या प्रकल्पास दिलेल्या प्रत्येक भेटीत, विदागारास पुनर्प्रेषण केल्या जाईल.योगदानकर्ते, जे सार्वजनिक संगणक वापरतात,व ज्यांना आपले सदस्यनाव त्या संगणकाच्या पुढच्या वापरकर्त्यास दाखविणे आवडणार नाही,त्यांनी वापरानंतर अश्या कुकीज हटवावयास हव्या.

पानाचा इतिहास

भाषांतर प्रकल्पांवरची संपादने किंवा इतर योगदाने, सदस्यपाने, चर्चापाने व इतर पाने ही सामान्यरित्या कायमस्वरुपी जतन केल्या जातात.प्रकल्पावरचा मजकूर हटविण्याने तो कायमस्वरुपी वगळल्या जात नाही.सामान्यपणे, कोणीही पानाच्या मागील आवृत्तीमध्ये काय होते ते बघु शकतो.जरीही एखादा लेख पूर्णपणे वगळल्या गेला तरीही,ज्या सदस्यास उच्च दर्जाची पोहोच आहे, तो कोणती जनतेस खुली माहिती हटविल्या गेली ते बघु शकतो.व्यक्तिद्वारे,translatewiki.net ला पोहोच असल्याने, कोणतीही माहिती कायमस्वरुपी वगळल्या जाउ शकते.पण अश्या दुर्मिळ स्थितीत,जेंव्हा न्यायालयाचे आदेशान्वये किंवा तत्सम कायद्याच्या प्रक्रियेनुसार, Translatewiki.netला एखादा संपादन-इतिहाय कायमस्वरुपी वगळावा लागतो, अश्यावेळेस निश्चित केल्या जाउ शकत नाही कि कायमस्वरुपी वगळणे होणार नाही.

सदस्याचे योगदान

सदस्यांच्या योगदानांचे एकत्रिकरण करून ते सार्वजनिकरीत्या उपलब्ध केले जाते. सदस्यांची योगदाने ही त्यांच्या नोंदणीनुसार व सनोंद प्रवेशस्थितीनुसार एकत्रित केली जातात. यात सदस्य योगदानाबाबतची माहिती, उदा. कोणत्या वेळी सदस्याने योगदान केले, किती संपादने केली, इ. आकडेवारी दिसते. ही माहिती सदस्य योगदान याद्या तसेच इतर सदस्यांद्वारे प्रकाशित होऊ शकते.
वाचन प्रकल्प
सदस्यांची व वाचनासाठी भेट देणाऱ्यांची यापेक्षा अधिक माहिती गोळा केल्या जात नाही, त्यापेक्षा जास्त, जी संकेतस्थळांमार्फत सर्व्हर लॉग्जद्वारे विशिष्ट प्रकारे गोळा केल्या जाते. सामान्य प्रयोजनासाठी जमा केलेल्या कच्च्या लॉग डाटा व्यतिरिक्त, पानास भेट देण्याने,भेट देणाऱ्याची ओळख सार्वजनिकरित्या उघडी होत नाही.नमूना कच्च्या लॉग डाटा मध्ये,कोणत्याही सदस्याचा अंकपत्ता अंतर्भूत असतो, पण तो सार्वजनिकरित्या पुनरुत्पादिल्या जात नाही.
प्रकल्पांचे संपादन
पानास केलेले संपादन हे संपादकाच्या सदस्यनावाने किंवा आंतरजाल अंकपत्त्याद्वारे ओळखल्या जाते व संपादन इतिहास हा लेखकानुसार योगदानयादीत एकत्रित केल्या जातो. अशी माहिती कायमस्वरुपी उपलब्ध राहते.
सनोंद-प्रवेशलेले(लॉग्डईन) नोंदणीकृत सदस्य:
ज्यात सदस्याद्वारे किंवा तोच अंकपत्ता असलेल्या दुसऱ्या सदस्याद्वारे, गैरवापर, ज्यात विकिपानावरचा उत्पात अंतर्भूत आहे,याशिवाय, सनोंद प्रवेशित सदस्यचा अंकपत्ता सार्वजनिकरित्या उघड होत नाही.translatewiki.netच्या सर्व्हर्सवर एका कालावधीपर्यंत,सदस्याचा अंकपत्ता संग्रहित असतो.तो सर्व्हर अॲडमिनिस्ट्रेटर द्वारे व ज्या सदस्यांना चेकयूजर सुविधा दिलेली आहे त्यांना दिसु शकतो.
अंकपत्त्याची माहिती व त्याचा कोणत्याही सदस्यनावाशी असलेला सहभाग,ही काही परिस्थितीत विमोचित केल्या जाउ शकते (खाली पहा).
ते संपादक, जे कंपनीचा मेल सर्व्हर घरुन वापरतात किंवा डीएसएल वर दूरसंदेशवहन करतात किंवा केबलमार्फतची आंतरजाल जोडणी वापरतात, त्यांना अंकपत्त्याद्वारे सहजच ओळखता येऊ शकते.या प्रकरणात, त्या अंकपत्त्याद्वारे एखाद्या प्रकल्पात करण्यात आलेले सर्व योगदान फेर-ओळखीने(क्रॉस आयडेंटीफाय) तपासणे सोपे आहे.या स्थितीमध्ये सदस्यनाव वापरणे हा गोपनीयता राखण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे.
सनोंद प्रवेश न केलेले नोंदणीकृत सदस्य व अनोंदणीकृत सदस्य:
ज्या संपादकांनी सनोंद प्रवेश घेतला नाही त्यांना आंतरजालाच्या अंकपत्त्याद्वारे ओळखता येऊ शकते.कोणाच्या जोडणीचा प्रकार पाहून,मोठ्या आंतरजालसेवा पुरवठादाद्वारे किंवा विशेषत्वाने एखाद्या शाळेतील,किंवा व्यापाराच्या ठिकाणात किंवा एखाद्या घरात असलेल्या या अंकपत्त्याचा मागोवा घेता येऊ शकतो.
चर्चा
विकि चर्चा पानावर:
कोणतेही संपादण्याजोगे पान हे चर्चा करण्याचे ठिकाण असु शकते.सामान्यपणे, translatewiki.net वरील चर्चा ह्या, (विशिष्ट सदस्यास संलग्न असलेल्या) सदस्य चर्चा पानावर,(विशिष्ट सहाय्यिभूत प्रकल्पांशी संलग्न) विशिष्ट सहाय्यिभूत प्रकल्पाच्या चर्चा पानांवर,किंवा अशा पानांवर, जी विशेषत्वानने चर्चापीठ म्हणून नेमलेली असतात(उदा.- साहाय्य पान), घडतात.गुप्ततेबद्दलच्या सर्व अपेक्षा चर्चा पानांनाही लागू होतात जश्या, त्या, त्याचप्रकारे इतर ठिकाणी लागू असतात.
विपत्राद्वारे(ई-मेल द्वारे):
सदस्यास त्याचा विपत्रपत्ता हा नोंदणीचेवेळी द्यावयाचा नसतो.त्या सदस्यांना, जे वैध अंकपत्ता पुरवितात,ते इतर सनोंद प्रवेशित सदस्यांना विकिमार्फत विपत्र पाठविण्यास मुभा देतात.या प्रणालीमार्फत दुसऱ्या सदस्यांमार्फत विपत्र मिळण्यावर,कोणाचाही विपत्रपत्ता त्यांना उघड केल्या जात नाही. दुसऱ्या सदस्यांना विपत्र पाठविण्याचे निवडल्यावर,कोणाचाही विपत्रपत्ता पाठविणारा म्हणून दर्शविल्या जातो.
पसंतीक्रमात टाकलेला विपत्रपत्ता हा translatewiki.netद्वारे आदानप्रदानासाठी वापरल्या जाऊ शकतो.सदस्य ज्यांच्या खात्याचा वैध विपत्रपत्ता नाही ते, त्यांचा परवलीचा शब्द विसरला तर,त्यास पुनर्स्थापित करु शकत नाही.या परिस्थितीत,सदस्य हे translatewiki.netच्या सर्व्हर प्रशासकास संपर्क करुन त्यांचा नविन विपत्रपत्ता टाकू शकतात.कोणताही सदस्य, वापरास प्रतिबंध करण्यासाठी, त्याच्या खात्याचा विपत्रपत्ता, त्याच्या पसंतीक्रमात जाऊन कधीही हटवु शकतो.त्या सदस्यांच्या तारतम्यानुसार,सदस्यांदरम्यान असलेला खाजगी पत्रव्यवहार वाचवल्या जाउ शकतो. हे translatewiki.netच्या नीतीनुसार असत नाही.
आयआरसी वर:
आयआरसी हे translatewiki.netचा भाग नाहीत व ते translatewiki.netच्या आधिपत्याखाली असलेल्या सर्व्हरवरुन कार्य करीत नाहीत.त्या सदस्यांचा अंकपत्ता जे अश्या सेवांद्वारे चॅट करतात,दुसऱ्या सहभागकांना उघड होऊ शकतो.प्रत्येक चॅनेल वरील आयआरसी वापरकर्त्यांची गुप्तता ही त्या त्या सेवादारांच्या व चॅनेलच्या नीतीनुसार राखल्या जाते.विविध चॅनेलच्या वेगवेगळ्या नीती आहेत ज्यात नोंदीदेखील प्रकाशित केल्या जाउ शकतात.

वैयक्तिक ओळखणीची माहितीस पोहोच व प्रसारण

पोहोच:

प्राथमिकरित्या, हा प्रकल्प स्वयंसेवकांच्या योगदानामार्फत चालविल्या जातो.काही समर्पित सदस्यांना विशेषाधिकार दिल्या जातात.उदाहरणार्थ-translatewiki.netवर सदस्याचा पोहोचस्तर हा त्या सदस्याच्या विविध साहाय्यिकृत प्रकल्पांवरील उपस्थितीनुसार(योगदानानुसार) ठरविला जातो.सदस्याचे गटाधिकार व गटसदस्यता ही सार्वजनिक असते.

इतर सदस्य ज्यांना खाजगी ओळखण्याजोग्या माहितीस पोहोच आहे त्यात,परंतु हे यापुरतेच मर्यादित नाही,चेकयूजर क्रियेस ज्याना पोहोच आहे,translatewiki.netचे कर्मचारी,त्यांनी नेमणुक केलेले व कंत्राटदार व अभिकर्ते व विकसक तसेच ते, ज्यांना सर्व्हरवर उच्चस्तरीय पोहोच आहे, हे अंतर्भूत आहेत.

इतर विशेषाधिकारीत सदस्यांशी माहितीचा सहभाग करणे हे "वितरण" समजल्या जात नाही.

मोचन:माहिती मोचनासाठीची नीती

translatewiki.netची ही नीती आहे कि खाजगी ओळख प्रगट करणारा डाटा, जो सर्व्हर नोंदींमध्ये किंवा चेकयूजर क्रियेदरम्यान डाटाबेस मधील अभिलेखात किंवा इतर असार्वजनिक पद्धतींद्वारे जमा केल्या जातो, तो, translatewiki.net च्या स्वयंसेवकामार्फत किंवा कर्मचाऱ्यांतर्फे खालील परिस्थितीत विमोचित केल्या जाईल:

  1. वैध सबपोईना(subpoena) किंवा कायदा अंमलबजावणीमार्फतची आवश्यक विनंती, यास प्रतिसाद म्हणून.
  2. बाधित सदस्याच्या परवानगीसह
  3. गैरवापराच्या तक्रारींच्या तपासासाठी आवश्यक असेल तेंव्हा,
  4. जेथे, पानाच्या दृश्याबाबत असलेली माहिती, जी स्पायडर किंवा बॉट द्वारे उत्पादित केल्या गेली आहे व त्याचे प्रसारण करण्यास किंवा ती बाब सोदाहरण सांगण्यास किंवा तांत्रिक बाबी निस्तरण्यास आवश्यक आहे,
  5. जेथे, सदस्य हा पानांवर उत्पात करीत आहे किंवा तोडफोडीची वर्तणुक करीत आहे, तर तेथे डाटा हा सेवा देणाऱ्यास,कॅरीअर किंवा तिसऱ्या पक्षाच्या व्यक्तीस अंकपत्ता प्रतिबंधनास मदत करण्यास किंवा संबंधित आंतरजाल सेवा देणाऱ्यास, तक्रारीची मांडणी करण्यास मदत करण्यास विमोचित केल्या जाऊ शकतो.
  6. जेथे,translatewiki.netच्या अधिकारांची सुरक्षा करण्यास, मालमत्ता किंवा translatewiki.netचा वापर करणारे किंवा जनतेची सुरक्षा सयुक्तिकरित्या आवश्यक आहे

वर वर्णन केल्या व्यतिरिक्त, translatewiki.netची नीती, वैयक्तिक ओळखणीची माहिती वितरणास, कोणत्याही परिस्थितीत परवानगी देत नाही.

तिसऱ्या पक्षाची पोहोच व कायद्यानुसार क्रमप्राप्त प्रक्रियेची, नोंदणीकृत सदस्यांना माहिती देणे:

सामान्य तत्व म्हणून,सर्व प्रकल्पातील वैयक्तिक ओळखण देणाऱ्या डाटास पोहोच व त्याचे धारण हे कमीतकमी असावे व त्याचा वापर हा प्रकल्पांना चांगले करण्याच्या अंतर्गत कामासाठीच असावा.एखादेवेळी,translatewiki.net ला एखादा सबपोईना(subpoena) किंवा कायदा अंमलबजावणी संस्थेद्वारे, किंवा न्यायालयाद्वारे किंवा समकक्ष सरकारी संस्थेद्वारे अनिवार्य विनंती मिळु शकते ज्यात, नोंदणीकृत सदस्यांबाबत माहितीची मागणीची असते व ती देणे व कायद्याद्वारे त्या विनंतीस पाळणे हे भाग केल्या जाऊ शकते. अश्या घटनेत, ज्यात कायद्यानुसार केलेली अनिवार्य विनंती आहे, असा सबपोईना(subpoena)मिळाल्यानंतर, translatewiki.net हे त्या बाधित सदस्यास तीन कामकाजाच्या दिवसात,सदस्याने त्याच्या/तिच्या पसंतीक्रमात दाखल केलेल्या विपत्रपत्त्यावर(जर असेल तर), विपत्राद्वारे, दखलपत्र(Notice) सूचना देण्याचा प्रयत्न करेल.

Translatewiki.net अधिसूचना/दखलपत्र मिळालेल्या अश्या सदस्यास कायद्याबद्दल किंवा यथायोग्य प्रतिसादाबद्दल, कोणताही सल्ला देऊ शकत नाही. Translatewiki.net याची नोंद घेते कि, अश्या सदस्यास, त्यास प्रतिकार करण्याचा किंवा त्या माहितीस मर्यादित ठेवण्यासाठी न्यायालयात तो सबपोईना(subpoena) रद्दबातल करण्याचा खटला दाखल करण्याचा कायद्यानुसार अधिकार आहे.सदस्य जे सबपोईनास(subpoena) किंवा ईतर कोणत्याही अनिवार्य विनंतीस विरोध करु ईच्छितात,त्यांनी, संबंधित लागू असणारे अधिकार व उपलब्ध असलेल्या कार्यपद्धतींबद्दल कायदेशीर सल्ला घ्यावा.

जर translatewiki.net ला सबपोईना(subpoena) रद्दबातल करण्यासाठी किंवा सबपोईनाला(subpoena) मर्यादित करण्यासाठी,जर सदस्याद्वारे किंवा त्याच्या वकिलाने केलेल्या कार्यवाहीच्या निकालास अनुसरुन, कोर्टात दाखल केलेला खटला(मोशन) मिळाला तर, translatewiki.net ती माहिती उघड करणार नाही जोपर्यंत, तसे करण्यास न्यायालयाचा आदेश मिळत नाही.

नोंदणीकृत सदस्यास विपत्रपत्ता देणे आवश्यक नाही.जर बाधित सदस्य जर विपत्रपत्ता देत नसेल तर, translatewiki.net हे जेंव्हा त्या सदस्याची कायदा अंमलबजावणीतर्फे खाजगी ओळखणीची माहिती उघड करण्यास विनंती मिळाली तर, त्या बाधित सदस्यास खाजगी विपत्र संदेशांद्वारे सूचना देऊ शकणार नाही.

जबाबदारीस नकार

Translatewiki.net हे मानते कि सदस्याची गुप्तता राखणे व त्याचे सुचालन(मेंटेन) हे विशेष मोलाचे आहे.translatewiki.netची ही गुप्तता नीती ही आमच्या सर्व्हरवर ठेवलेली मर्यादित सदस्य माहितीची सुरक्षा राखण्यात एकत्रित प्रयत्न प्रतिरुपित करते.याशिवाय translatewiki.net याची खात्री देउ शकत नाही कि सदस्य माहिती ही गुप्तच राहील. आम्ही हे मान्य करतो कि आमच्या, खाजगी सदस्य माहितीस सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नांव्यतिरिक्तही,जिद्दी व्यक्ति ह्या डाटा मायनिंग व इतर रितींद्वारे, अशी माहिती उघड व प्रगट करु शकतात.या कारणास्तव translatewiki.netच्या प्रकल्पांमध्ये किंवा त्याच्याशी संबंधित समाजात केलेल्या सहभागाने,त्यातील माहितीस अनधिकृतरित्या पोहोच करण्याविरुद्ध कोणतीच हमी देत नाही.

इंग्लिश भाषेत असलेली या पानाची मूळ आवृत्ती व भाषांतरीत आवृत्ती यात जर काही परस्परविरोधी माहिती आढळली तर, भाषांतरीत आवृत्तीपेक्षा इंग्लिश आवृत्तीस प्राथम्यक्रम राहील.

In cases of conflicting information between a translated version of this page and the original version in the English language, the English version will take precedence over the translated version.