भाषांतर:नविन प्रकल्प
Jump to navigation
Jump to search
Outdated translations are marked like this.
ट्रांसलेटविकि.नेट ला पुढे वाढायचे आहे
आम्ही नविन प्रकल्प शोधत आहोत!आम्हास संपर्क करण्यास व आपला प्रकल्प 'ट्रांसलेटविकि.नेट'शी कसा जोडला जाईल याची चर्चा करण्यास कचरू नका.आम्ही आपल्या स्वयंसेवक-भाषांतरकारांनी केलेल्या कामांचे मुल्य जाणतो,याचा अर्थ असा कि,आम्ही अश्या सुदृढ प्रकल्पांना शोधित आहोत,जे भविष्याकडे बघून विकसित केल्या गेलेले आहेत.विकसक व भाषांतरकार यांचे दरम्यानच्या देवाण-घेवाणीवर आम्ही जोर देतो.नव्या प्रकल्पात काय असावे त्यावर प्रकाशझोत टाकलेली एक त्रोटक यादी व स्वीकृती झाल्यावर कोणती प्रक्रिया निवडावयास हवी, हे खाली दिलेले आहे.
आम्हास गरज आहे...
मनमोकळेपणा | |
![]() |
आम्ही फक्त असेच प्रकल्प स्वीकारतो ज्यास, मुक्त व खुला स्रोत परवाना आहे.आम्हास,कोणास थेट साहाय्य करावयास हवे याची निवड करावी लागते, कारण आमचे मुळ हे मिडियाविकि व विकिमेडिया आहे,हे आमच्या अत्युच्च मुल्यावर आहे. जर आपला अर्ज हा मुक्त(परवान्याचा)नसेल व आपणास आमचे संचेतन (सॉफटवेअर) वापरायचेच आहे, तर,दस्ताऐवजीकरण येथे बघा. |
विकास | |
![]() |
नविन प्रकल्प हा क्रियाशील विकासात हवा व तो 'आवृत्ती नियंत्रण प्रणाली' वापरत असावा.आम्ही पूर्वीपासूनच सीव्हीसी, सबव्हर्शन व गिटशी अवगत आहोत.त्या प्रकल्पाने,नियत-कालावधीत प्रकाशने करावित किंवा भाषांतराचा ईतर मार्ग अवलंबावा.झालेले भाषांतर प्रत्यक्ष उपयोगात आणण्याचा कालावधी कमीत-कमी करावा.प्रत्यक्ष झालेले भाषांतर लवकर वापरात आणण्याचे अनेक मार्ग आहेत, त्याबद्दल चर्चा करता येते. |
एकत्मीकरण | |
![]() |
एकदा आपल्या प्रकल्पाचा मूळ आशय टांसलेटविकि.नेटवर भाषांतरीत झाल्यावर,आदर्शपणे,टांसलेटविकि.नेट चे कर्मचारी, झालेले बदल आपल्या उत्पादनात,एकत्रित करू शकतात.यासाठी, भाषा जोडण्याची पद्धत आवश्यक आहे व त्यासाठी, टांसलेटविकि.नेटच्या किमान एका कर्मचाऱ्यास हे नक्की करण्यास कि भाषांतराचे काम खरोखरच एकत्रित होईल,(थेट चालनेने) पोहोच करावी लागते. टांसलेटविकि.नेट च्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या स्रोत नियंत्रण प्रणाल्यांना वापरण्याचा पुष्कळ अनुभव आहे. |
आम्हास आवडते...
i18n चे साहाय्य | |
![]() |
आम्ही फक्त यूटीएफ-८ कॅरेक्टर एन्कोडिंग द्वारे सहाय्यीभूत आहोत.चलांच्या, अनेक वेगवेगळ्या अनेकवचनांच्या व उजवीकडून डावीकडे वाक्य लिहीत असणाऱ्या भाषांसाठी i18n फ्रेमवर्कचे सहाय्य घेणे निवडल्या जाते.व्याकरणाच्या प्रकारांसाठी,तसेच सदस्याचे लिंग, जेथे सदस्याशी थेट संवाद साधला जातो किंवा ईतर सदस्य, ज्यांना ईंटरफेस मजकूरात नमूद केल्या जाते,त्यात साहाय्य घेणे आम्ही आवश्यक समजतो.हे क्षेत्र असे आहे ज्यात सर्वात जास्त अडचणींचा सामना करावा लागतो व त्यामुळे कामास उशीर होतो.हे टाळण्यास, आमच्या उपयुक्त सुचना विकसकांसाठी स्थानिकीकरण येथे प्रयत्न करा व तपासा. |
संवाद | |
![]() |
प्रकल्पाचा विकसक हा टांसलेटविकि.नेट वर प्रश्नांना उत्तरे देण्यात क्रियाशील असावा, नविन येणाऱ्या प्रकाशनांची माहिती देणे,प्रकल्पाच्या विकसक-गटासमवेत समन्वय राखणे, ईत्यादी. विकसक समुदाय व भाषांतरकारांच्या समुदायात ज्ञानाचा मुक्त प्रवाह वहात राहील्यास,आमची स्थानिकीकरणास होणारी पोहोच उत्तम रितीने काम करते. |
संचिका प्रारूप | |
![]() |
ट्रांसलेटविकि.नेट प्रणाली ही भाषांतरीत संचिकांवर आधारीत आहे.आमच्याद्वारे, कि-बेस्ड फाईल फॉरमॅट निवडल्या जातो, जसे,जावा प्रॉपर्टीज व रुबी-स्टाईल वायईमएल.पी एचपी अरेज,पीएचपी व्हेरिएबल्स व गेटटेक्स्ट हे इतर साहाय्यीभूत फाईल फॉरमॅट आहेत.आपल्या विचारात, जर इतर कोणता फाईल फॉरमॅट असल्यास आम्हास कळवा;आमच्या अनुभवाप्रमाणे,जर आपण पीएचपीमध्ये निष्णात असाल तर, हा फाईल फॉरमॅट जोडण्यास आपणास सोपे जाईल. |
Still interested? Good. You can contact us via,
- Our issue tracker - Phabricator. Fill out the project information section on this task template.
- Our support page. First, create an account as a developer (using the Can't submit some translations right now? option) on the homepage, wait for your account to be approved and then create a support ticket.
If you want to explore some more first, then try the localisation for developers page.